कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी 24 जुलै 22 रोजी संपन्न होणार असून त्यासाठी नामनिर्देशन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 23 जून 2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे.व फॉर्म मागे घेण्याची तारीख 27 जून 2022 ते 19 जुलै 22 दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नेहमी अटीतटीची होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलनणयात आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला आणखी 2 वर्षे मिळून 7 वर्षे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. असे असले तरी 5 वर्षापुर्वी आजी-माजी संचालक मंडळाने बिनविरोध निवडणुकीची संकल्पना राबवून अडीच वर्षानी पहिल्या संचालकानी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या फळीतील उमेदवाराना आपले संचालकपद अडीच वर्षानी रिक्त करून द्यावयाचे होते .परंतु निवडणूक नियमांचा आधार घेत एकाही संचालकाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे अनेक उमेदवार नाराज आहेत. म्हणूनच यावर्षी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बहुसंख्य विद्यमान संचालकानी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी येत्या 23 जून पर्यंत विविध खात्यातील कांही ईच्छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवाय निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या तारखेपुर्वी बिनविरोध संकल्पना राबविणयासाठी फॉर्म दाखल केलेल्या उमेदवारांची बैठक घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्यथा कांही तालुका व जिल्हा प्रवर्गातील जागांसाठी निवडणूक होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे असे समजते.