You are currently viewing माझे स्वाभिमानी बाबा

माझे स्वाभिमानी बाबा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांची अप्रतिम काव्यरचना

बाबा सारखाच बाप
जगी असावा विरळ
अभिमान आहे मला
लेक त्यांची मी नितळ.

होते शिक्षक पेशाने
दिले लेणे संस्कारांचे
बहुमान मिळवला
झाले लाडके सर्वांचे.

संघर्षाला तोंड दिले
घरी, दारी ,व्यवहारी
पण हार न मानली
सर्वां झोंबले जिव्हारी.

कास धरली सत्याची
स्वीकारली न लाचारी
अभिमानास्पद जीणे
होते त्यांचे सदाचारी

संस्काराचे दिले लेणे
आम्ही ही ते जोपासले
होतकरू झालो आम्ही
नाव बाबांचे राखले.

बाप असे झटतात
जाण ठेवावी मुलांनी
वय होता थकतात
सेवा करावी पोरांनी.

शोभा वागळे
मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा