बांदा :
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित सर्व दहाही भगिनी शाळांचे निकाल १०० टक्के लागले असून या यशात शिक्षणमहर्षी कै. आबासाहेब तोरसकर यांचे मोठे योगदान अाहे. ते आज आपल्यात नसले तरी त्याचे ध्येय आज विदयार्थी, पालक, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदीनी पूर्ण केले आहे. या यशात सर्वांच्या योगदानाबद्दल नूतन संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी खास अभिनंदन केले आहे.
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :
खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल, बांदा
बांदा येथील खेमराज हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून ८७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. प्रशालेत प्रथम सिद्धी महेश तळगावकर (९५.६०), द्वितीय वैष्णवी गोविंद भांगले (९५.४०), तृतीय प्रणव गणपत नाईक (९५) टक्के.
न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा
न्यू इंग्लिश स्कुल मडुरा हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतून परीक्षेसाठी ६३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रशालेतून प्रथम साक्षी चंद्रकांत पोखरे (९०.४०), द्वितीय प्रथमेश सखाराम कासकर (९०.२०), तृतीय कृष्णा शांताराम गावडे (८५.८०).
डेगवे हायस्कूल, डेगवे
डेगवे हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून परीक्षेसाठी २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रशालेत प्रथम शलाका विठू आईर (८९.४०), व्दितीय वैभव प्रमोद देसाई (८६.८०), तृतीय पुर्वा संजय गवस (८४.६०) टक्के.
नवभारत विद्यालय, परेल (मुंबई)
परेल येथील नवभारत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेत प्रथम रोशनी राघवेंद्र बासुतकर (८४), द्वितीय प्रेम लिंगाप्पा मांदेश (८०.८०), तृतीय सोनल नामदेव रामाणे (७८.६०) तर कविता गोविंदा मारपल्ली (७८.४०) व हर्षदा कोडीराम काजलकर (७५.८०) टक्के गुण मिळवून अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला.
श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालय, आयी
आयी (दोडामार्ग) येथील श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेत प्रथम प्रज्योत पवित्रनाथ गवस (७८.६०), द्वितीय श्रृतिका दत्ताराम मोरजकर (७५.४०), तृतीय प्रथमेश प्रकाश न्हावी (७१) टक्के.
श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये
असनिये येथील श्री शिवछत्रपती हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेत प्रथम साक्षी सुभाष गावकर (८९.८०), द्वितीय अस्मिता अानंद सावंत (८७), तृतीय स्वप्नाली संजय सावंत (८४) टक्के.
न्यू इंग्लिश स्कूल भेडशी
भेडशी (दोडामार्ग) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून एकूण ६९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. प्रशालेत प्रथम युक्ता मकरंद करमळकर (९०.६०), द्वितीय सोनिया गजानन गौंडळकर (९०.१०), तृतीय शुभम एकनाथ गवस (८९.२०) टक्के.
सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेज सायन्स, कुडासे
कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिरचा निकाल प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेत प्रथम आदित्य जालिंदर शेंडगे (९६.८०), द्वितीय अपूर्वा प्रविण घाडी (९४.६०), तृतीय नारायण संदेश चारी व आदिती लक्ष्मण देसाई (९४.४०) टक्के.
श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे
पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विदयालयाचा १००% निकाल लागला आहे. परीक्षेसाठी एकूण २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रथम तन्वी प्रेमानंद तळणकर (८९.८०), द्वितीय दिव्यता दिपक नाईक (८८.६०), तृतीय कविता रामा गवस (८८.२०) टक्के.
समाजसेवा हायस्कूल, कोलझर
कोलझर (दोडामार्ग) येथील समाजसेवा हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून प्रथम कविर धीरज सावंत (८६.८०), द्वितीय धनश्री पांडुरंग राणे (८६.२०), तृतीय रजनी ज्ञानेश्वर नाईक (८५.८०) टक्के.
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सीमाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव श्रीमती कल्पनाताई तोरसकर, सर्व कार्यकारणी सदस्य, प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, समन्वय समिती सहसचिव लक्ष्मण पावसकर, शालेय समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.