पूणे :
पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे (वय २२) यांनी अपघातामुळे आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून काल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह, लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते. पुण्यातील हडपसर परिसरात गोंधळे नगर येथे त्या राहण्यास होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी तिचे आई-वडील आणि बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच वेळेस विशाखाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाखा काळे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती.
विशाखा यांच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, काही महिन्यांपूर्वी विशाखाचा अपघात झाला होता. या अपघातामुळे तीच्या चेहर्यावर काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे मागील एक वर्षभरापासून नैराश्यात होती. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे काही काम मिळत नव्हते. त्यामुळे नैराश्य वाढतच गेले आणि यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यांना एक छोटी बहिण आहे. त्याही नृत्य करतात. त्यांची आई एका खाजगी शाळेत शिपाई ची कामे करतात तर वडील मोहन काळे हे अंध आहेत. विशाखा यांच्या अचानक अशा आत्महत्या प्रकरणामुळे काळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.