You are currently viewing पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांची अर्जुन रावराणे विद्यालयाला भेट

पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांची अर्जुन रावराणे विद्यालयाला भेट

*विविध विषयांवर विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन*

 

*’पोलीस मित्र’ संकल्पनेची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक*

 

वैभववाडी / प्रतिनिधी :

अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आज वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘पोलीस मित्र’ या संकल्पनेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने आज विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैभववाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी विद्यालयाला भेट दिली. करीयर मार्गदर्शन, मोबाईलचा दुरुपयोग, संकट समयी ११२ क्रमांकावर मदतीस संपर्क साधणे, व्यसनाचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम, आपल्या सोबत गैरव्यवहार अथवा गैरवर्तन झाल्यास पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणे. अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, हेड कॉन्स्टेबल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल कोलते, हेडकॉन्स्टेबल शिंगाडे मॅडम प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस., माध्यमिक विभाग प्रमुख श्रीम.पाटील एस.एस. सांस्कृतिक विभाग प्रमुख चोरगे एम.एस, तुळसणकर एस.टी. शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उपस्थितांचे आभार पाटील मॅडम यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा