किनारपट्टी संरक्षण बंधारासाठी भरीव निधी मंजूर
सावंतवाडी :
युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून निधीची तरतूद केली आहे. रेडी, केरवाडी, शिरोडा, सागरतीर्थ किनारपट्टीला संरक्षण होण्यासाठी धूपप्रतिबंध बंधारा होण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता नाणोसकर यांनी निवेदन देऊन मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द पाळून शिरोडा किनारपट्टीला 13.50 कोटी, केरवाडी किनारपट्टीला 10.50 कोटी, रेडी किनारपट्टीला 4.50 कोटी, सागरतीर्थ किनारपट्टीला 12.60 कोटी, मोचेमाड किनारपट्टीला 7 कोटी आणि सावंतवाडी कवठणीला 3.20 कोटी असा भरीव निधी मंजूर केला आहे.