वेंगुर्ला :
२१ जून मंगळवार रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉल येथे सकाळी ६.०० ते ७.३०. वा. या वेळेत जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
योग असे जेथे… आरोग्य वसे तेथे….हे ब्रीद घेऊन वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला आणि सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था, सिंधुदुर्ग डॉ. वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जागतिक योग दिन कार्यक्रम होणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.