सिंधुदुर्गनगरी :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गंत पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेचा केळी, काजू व आंबा कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे-4 यांनी केले आहे.
अंबिया बहार सन 2020-21 अंतर्गंत योजनेमध्ये सहभागी होणयची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी केळी पिकाकरीता 31 ऑक्टोबर 2020 तसेच काजू आंबा पिकाकरिता 30 नोव्हेंबर 2020 आहे. तसेच चालू वर्षापासून केळी पिकांच्या कमी व जास्त तापमान या हवामान धोक्याच्या प्रमाणकामध्ये बदल करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना क्षेत्रातील फळपिकांकरिता एैच्छिक स्वरुपाची आहे. मात्र कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबतचे प्रमाणपत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम दिनांकांच्या सात दिवसाच्या अगोदर देणे गरजेचे आहे.
वरिल फळपिकांसाठी नोंदणी करण्याकरिता राष्ट्रीय पीक विमा पोर्टल पुढील आठवड्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. तरी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे-4 यांनी केले आहे.