You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान फिलॉस द्वारे जिल्ह्यातील विविध शासकीय, अशासकीय व खाजगी संस्थांच्या सहकार्यातून वृक्ष लागवड अभियान..

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान फिलॉस द्वारे जिल्ह्यातील विविध शासकीय, अशासकीय व खाजगी संस्थांच्या सहकार्यातून वृक्ष लागवड अभियान..

कणकवली:

 

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान फिलॉस द्वारे जिल्ह्यातील विविध शासकीय, अशासकीय व खाजगी सम्थांच्या सहकार्यातून यावर्षी वृक्ष लागवड अभियान आयोजित केले आहे. या अभियानाची नियोजन बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या अधिकान्याच्या उपस्थितीत संपन्न झाली. COP 26 या राष्ट्रीय प्रमुखांच्या संमेलनामध्ये २०३० पर्यंत झाडे कापण्यावर बंदी आणण्याचा ठराव झालेला आहे. वृक्ष लागवड हवेतील कर्ब कमी करण्यासाठी फार महत्वाची बाब आहे. त्यातून हवेतील प्रदूषण कमी होऊन जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी मदत होईल. त्यासाठी यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्ष लागवड अभियान सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून विविध खात्यांची मदत घेऊन राबविण्यात येणार आहे. सिंधुदुर्गं मध्ये कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, सैनिक फेडरेशन, कृषि विभाग, वन विभाग, सामाजिक वनिकरण, शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था यांच्या सहकार्यातून १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत दहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सुशांत नाईक, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास सावंत, अनघा रामाने, आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना श्री सावंत पुढे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभा संपन्न झाली. त्या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा कृषि अधिकारी, वन अधिकारी, शिक्षण अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. लागवडीसाठी लागणारी झाडे उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी विविध खात्यांच्या अधिकान्यांना या सभेत दिले आहेत. नरेगा व मनरेगाच्या माध्यमातून शेतकल्यांना झाडाची उपलब्धता करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. विविध प्रक्षेत्रे, सार्वजनिक ठिकाणे, चराऊ कुरणे. वनक्षेत्र, पडीक जमिनी, शाळा परिसर, महाविद्यालय परिसर, मंदिर परिसर, शेताचे बांध, रस्ते दुतर्फा तलाव परिसर, परसबाग इत्यादी ठिकाणी उपयुक्त झाडांची लागवड करण्यात येणार आहे. लागवडीमध्ये

विविध फळझाडे, बनझाडे, औषधी झाडे, शोभिवंत झाडे, प्राधान्य क्रमाने लावण्यात येणार आहेत. ही लोक चळवळ उभारण्याचा सैनिक फेडरेशन आणि सहयोगी संस्थांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात २०२७ पर्यंत २० कोटी झाडे लावण्यात येतील. अनेक जिल्ह्यामध्ये सैनिक फेडरेशन यावर्षी सुरुवात करत आहे. यासाठी शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत, NCC, NSS, भारतीय सैन्य आणि सेवा भावी संस्था यांच्या सहभागाने झाडे लावणे आणि झाडे जगवणे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात फळ झाडे लावण्यात येणार आहेत. जेणेकरून रानटी जनावरांनी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये येऊ नये म्हणून लोकांच्या सहभागाने प्रयत्न करण्यात येईल. औरंगाबाद येथे इकॉलॉजिकल टास्क फोर्सच्या माध्यमातून पडीक क्षेत्रात नऊ लाख झाडे लावण्यात

आली आणि ९५ टक्के झाडे जगवण्यात आली. त्याचप्रमाणे निवृत्त सैनिकांच्या नेतृत्वाखाली सर्वकडे हा

कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा वन अधिकारी व कृषि अधिक्षक या सर्वांचे सहकार्य घेण्यात येत आहे.समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प आणि नैसर्गिक शेती प्रकल्प कृषि प्रतिष्ठान द्वारे राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये प्राधान्य क्रमाने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. समृद्ध आणी आनंदी जीवनासाठी निसर्ग संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने कमीत कमी दरवर्षी एक तरी झाड लावून त्याचे रक्षण करावे. ही लोक चळवळ आहे. म्हणून समाजातल्या सर्व घटकांनी या मोहिमेमध्ये उत्स्फुर्तपणे भाग घ्यावा व जास्तीत जास्त झाडे लावावीत असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =