सावंतवाडी :
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम १००% पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वे आता पूर्णतः विजेवर धावणार आहे. रोहा पासून बिजूर पर्यत ७४२ कीमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता प्रदूषण मुक्त प्रवास होणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनाचे ७० टक्के इंधन वाचणार आहे. या मार्गासाठी १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या मार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा २० जुन २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बेंगलोर येथून व्हिडिओ व्दारे या कार्यक्रमाला श्री. मोदी उपस्थित राहून झेंडा दाखवणार आहेत. तर कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि उडपी या तीन स्थानकावर दुपारी २:२० वाजता यानिमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.