युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी केले परिसरातील विद्यार्थांना लाभ घेण्याचे आवाहन
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थी तसेच इतर नागरीकांना लागणारी आवश्यक कागदपत्रे लवकर मिळत नाहीत.कागदपत्रांची पुर्तता करताना विद्यार्थांची धावाधाव होते.यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्यास एकाच दिवशी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना एकत्र आणून केम्प भरवुन एकाच ठिकाणी दाखले देण्यात यावे अशी मागणी तहसीलदार अरूण खानोलकर यांच्याकडे करण्यात आली होती.त्याची सुरुवात येत्या सोमवारपासून लक्ष्मी गिरीजा ऑनलाईन सेंटर बॅक ऑफ इंडिया शाखेजवळ होत असल्याने परिसरातील सर्व विद्यार्थी तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.