कुडाळ :
हुमरमळा वालावल गावातील भाजपचे काम करुनही आपल्या कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केलेले प्रसाद परकर यांना घरदुरुस्तीसाठी शिवसेनेचे अतुल बंगे यांच्याकडून रोख वीसहजार आणि मोफत ताडपत्री सरपंच सौ. अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत यांच्या हस्ते देण्यात आली.
प्रसाद परकर हे गवंडीकाम काम करुन आपल्या कुटुंबाचा चरीथार्थ चालवित असुन उत्कृष्ट नाट्य कलावंत आहेत. त्यांनी गेली १० वर्षे आपणास घरबांधणी किंवा घरदुरुस्तीसाठी मदत व्हावी अशी मागणी भाजपाच्या पदाधिकारी यांच्या कडे केली होती. परंतु निवडणूक आली कि अतुल बंगे यांच्या विरोधात काम करणे एवढाच वापर भाजपने आपणांकडुन करुन घेतला. अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत श्री परकर यांनी शिवबंधन बांधुन आमदार वैभव नाईक यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवुन शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रसाद परकर यांना आज अतुल बंगे यांच्याकडून रोख वीस हजार रुपये घरासाठी मदत म्हणून तसेच ताडपत्री मोफत देण्यात आली.
यावेळी बंगे म्हणाले हुमरमळा वालावल गावातील प्रत्येक घरामध्ये खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना मानणारा वर्ग मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रत्येकला मदत आणि सहकार्य आपण नेहमीच करु असे श्री बंगे यांनी सांगितले. तसेच विनोद परकर यांनाही मोफत ताडपत्री देण्यात आली. यावेळी सरपंच सौ अर्चना बंगे उपसरपंच स्नेहल सामंत, माजी सरपंच प्रविण मार्गि, संदीप प्रभु, तात्या कद्रेकर, विनोद परकर, विजय परकर, युवासेनेचे हुमरमळा शाखाप्रमुख संदेश जाधव, वैभव मांजरेकर उपस्थित होते.