You are currently viewing कृषि विद्यार्थिनींनी इन्सूली गावात केले भात बियाणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक..

कृषि विद्यार्थिनींनी इन्सूली गावात केले भात बियाणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक..

सावंतवाडी :

 

तालुक्यातील इन्सूली गावात भात बियाण्यावरील बीज प्रकिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून शेतकर्‍यांना भात बियाण्यावरील विविध बीज प्रक्रियांची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमास गावातील शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवली.तसेच गावाच्या कृषि सहायक श्रीमती सीमा घाडे, गावाचे उपसरपंच श्री. रामचंद्र चराटकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन गावात उपस्थित असलेल्या उद्यान विद्या महाविद्यालय, मूळदेच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनीं वैभवी भुवड, प्रिया नंदेश्वर, संस्कृती साळगावकर, मिताली उळे, हर्षली राठोड, वैदिका साळवे, मनाली शिंदे यांनी केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा