You are currently viewing जि. प. कळसुली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त आशासेविकांना जायफळाची झाडे वाटप

जि. प. कळसुली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त आशासेविकांना जायफळाची झाडे वाटप

कणकवली :

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कळसुली गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा, मा.प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली आशासेविकांना जायफळाच्या झाडाचं वाटप करण्यात आले.

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील आशासेविकांना जायफळ ची झाडे वाटप केली असल्याने युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.प्रफुल्ल सुद्रीक यांच आशासेविकांमधून समाधान व्यक्त केलं जातं आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, भरत गांवकर,मा. ग्रां. पं. सदस्य सत्यविजय परब, रोहन सुद्रीक, अक्षय घाडीगांवकर, लक्ष्मण गांवकर यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा