*शिरोडा सरपंच मा.श्री मनोज उगवेकर,उपसरपंच मा. श्री राहुल गावडे,रेडी जि.प. माजी सदस्य मा.श्री प्रितेश राऊळ,गट साधन केद्र वेंगुर्ला विषय तज्ञ मा.श्री टिळवे सर,शा. व्य.समिती उपाध्यक्ष मान.श्री कांता तारी व इतर सन्माननीय सदस्य यांची उपस्थिती*
*शिरोडा सरपंच मा.श्री मनोज उगवेकर यांजकडून मुलांना खाऊचे वाटप*
वेंगुर्ला :
बुधवार दिनांक 15/6/2022 रोजी सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा नं 1 येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सक्ती पात्र बालकांचे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा टप्पा 2 व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.
या मेळाव्या प्रसंगी सर्व प्रथम सक्तीपात्र बालकांसह प्रभात फेरी काढून लेझिम,ढोल ताशा सह बालकांना शाळेत आणून त्यांचे स्वागत करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. तसेच सात स्टॉलची मांडणी करून बालकांच्या विविध कृती घेवून मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्याच्या निमित्ताने शिरोडा सरपंच मा.श्री मनोज उगवेकर, माजी जि.प.सदस्य मा.श्री प्रितेश राऊळ, शा. व्य. समिती शिरोडा नं 1 माजी अध्यक्ष व विदयमान सदस्य मान. लक्ष्मीकांत कर्पे आणि मा.श्री टिळवे सर गट साधन केंद्र वेंगुर्ला यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यासाठी व प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत उपसरपंच मा.श्री राहुल गावडे,शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री कांता तारी,सदस्य श्री नामदेव गावडे,श्रीमती अस्मिता सावंत,श्रीमती शर्वरी कांबळी,श्री फ्रान्सिस फर्नांडिस,श्रीमती संतान फर्नांडिस, अंगणवाडी सेविका ,मदतनीस,पालकवर्ग, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते. या वेळी मा.शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांजकडून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेमध्ये 17 विद्यार्थी यांनी पहिली वर्गात प्रवेश घेतला. या मेळाव्याचे व प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रेमदास राठोड यांनी केले.