You are currently viewing विहिरीत पडलेल्या वन्य प्राण्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या वन्य प्राण्याला जीवदान

 *वनविभागाच्या रेक्यू पथकाला यश; सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात*

 

वेंगुर्ला :

वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-बागायतवाडी येथील सीताराम आरोलकर यांना त्यांच्या विहीरी मध्ये वन्यप्राणी बिबट पडल्याचे कळताच त्यांनी तात्काळ स्थानिक वनकर्मचा-यांना माहिती दिली. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तत्परतेने घटनास्थळी दाखल होत २० ते २५ फूट खोल विहिरीतून वन्यप्राणी बिबट यास सुखरूप बाहेर काढले. तत्पूर्वी कठडा नसलेल्या या विहिरीत ग्रामस्थांनी विहिरीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने पाण्यात फळी सोडल्याने त्या फळीचा आधार घेत बिबट त्यावर बसून राहिला.

नर जातीचा हा २.५ ते ३ वर्षे वयाचा हा बिबट भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आलेने कठडा नसलेल्या या विहिरी मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे यांनी सांगितले.

स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या वन्यप्राणी बिबट चा जीव वाचवता आला. ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.

 

पशु वैद्यकीय अधिकारी कुडाळ श् ठाकूर यांचे कडून रेस्क्यू करण्यात आलेल्या वन्यप्राणी बिबट ची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सदर वन्यप्राणी बिबट चे रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक सावंतवाडी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, वनपाल मठ हरी लाड, वनपाल नेरूर धुळु कोळेकर, वनरक्षक मठ सूर्यकांत सावंत, वनरक्षक तुळस विष्णू नरळे, वनरक्षक नेरूर सावळा कांबळे यांनी स्पोलीस पाटील जनार्धन पेडणेकर व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =