You are currently viewing कोविड 19 प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे सर्वंकष सर्वेक्षण करा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

कोविड 19 प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे सर्वंकष सर्वेक्षण करा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

 कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिलांचे सर्वंकष सर्वेक्षण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. कोविड 19 च्या पादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांसदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमोल पाटील, कौशल्य विकास रोजगार अधिकारी ग.प्र.बिटोडे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्रीपाद दामले, तंत्रशिक्षणाधिकारी ए.एल.नातु, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नितीन काळे, अग्रणी बँकेचे मुकेश मेश्राम, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, संरक्षण अधिकारी संस्थात्मक काळजी उदय मालवणकर तसेच सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते.

            कोविड महामारीमुळे ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांच्या कौटुंबिकृष्ट्या विचार करता त्यांना मिळणारे लाभ तसेच मिशन वात्सल्य अंतर्गत देण्यात येणारे लाभ याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्हा परिषदेकडील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, विधवा महिलींचे सर्वेक्षण 30 जून अखेर पूर्ण करावा. सर्वेक्षण करताना कोविड 19 महिलांना शासनाच्या विविध विभागांमार्फत देणअयात येणाऱ्या 24 प्रकारच्या योजनांच्या लाभाविषयीची प्रश्नावली द्यावी. ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे संकलित केल्यानंतर ही यादी जिल्हा परिषद, उद्योगविभाग, कौशल्य विकास विभाग, कृषी विभाग, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी पाठविण्यात यावी. पात्रतेनुसार यांना योजनांचा व प्रशिक्षणाचा लाभ देण्यात यावा. ज्या विधवा महिलांना नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करावयाचा आहे त्यांना अग्रणी बँक व अन्य बँकांकडून अर्थसहाय्य ही उपलब्ध करून द्यावे. या सर्वेमध्ये विधवा महिलांना अंगणवाडी सेविकांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा