You are currently viewing आज सकाळी महामार्गावर ट्रकची धडक बसून शाळकरी विद्यार्थिनी गंभीर

आज सकाळी महामार्गावर ट्रकची धडक बसून शाळकरी विद्यार्थिनी गंभीर

कणकवली

महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने चालत येत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची धडक बसून शाळकरी विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. जखमी स्थितीत रस्त्यावर कोसळलेल्या अवस्थेत असताना जखमी विद्यार्थिनी आर्या कालिदास भातवडेकर (वय 14, वागदे) हिला तातडीने कणकवलीतील भाजपाचे कार्यकर्ते राजा पाटकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तसेच धडक दिलेल्या ट्रक चालकालाही तेथेच थांबवण्यात आले. हलवलं फाट्यापासून लावण्यात आलेले अनेक स्टॉल हे धोकादायक स्थितीत लावण्यात आले आहेत. रस्त्यालगत स्टॉल लावलेले असल्याने तेथे वाहने पार्किंग केले जात असल्याने याठिकाणी अपघाताचा धोका अजूनच वाढत आहे. शनिवारी सकाळी आर्या ही कणकवली च्या दिशेने महामार्गाच्या बाजूने चालत शाळेत जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. यात जोरदार धडक बसल्याने रक्तबंबाळ स्थितीत आर्या रस्त्यावर कोसळली. याच वेळी तेथून जात असलेल्या राजा पाटकर यांनी तिला एका कार मधून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आर्या हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिच्या डोक्याचे सिटी स्कॅन करण्या करिता तिला दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा