*lजागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम अभंग रचना
झाड पानोपानी दंग,नाम विठुचे घेण्यात
भूक पेरुनी रानात,दंग अभंग गाण्यात!!धृ! !
कळी वाजवी चिपळ्या,फुल उधळी अबीर
वारा वाजवी मृंदुग,पान टाळकरी वीर
पक्षी वारकरी झाले,विठू बोलण्या अधिर
वाणी अमृत बोलता,दंग अभंग गाण्यात. !!१ !!
हरी रूपे तुझी अशी, जगी चराचरी असे
खळखळ गातो झरा ,जणु चंद्रभागा भासे
वेळू बासरी वाजवी,छान मोरपिस दिसे
देव क्षणोक्षणी दिसे,तो पुंडलिक पाण्यात!!२ !
हार तृणाचे गळ्यात,हसे मनात पंढरी
ढोल ढगांचा वाजता,भीजे चिंब वारकरी
विठू दंगला रानात,नामा,चोखा तुका सारी
देव अणुरेणु माझा,दंग अभंग गाण्यात !!३!!
मुबारक उमराणी
सांगली.
९७६६०८१०९७.