You are currently viewing प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या सर्व आस्थापनांच्या पत्त्यात सिंधुदुर्गनगरी असा उल्लेख करा – वसंत बांबुळकर

प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या सर्व आस्थापनांच्या पत्त्यात सिंधुदुर्गनगरी असा उल्लेख करा – वसंत बांबुळकर

उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे मागणी, अन्यथा आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी

ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या गावांचा काही भाग घेवून शासनाने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण स्थापन केले आहे. तसेच या हद्दीत येणाऱ्या कार्यालय व अन्य आस्थापनांचे पत्ते बदलण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक ही काढले आहे. मात्र असे असतानाही काही कार्यालयांच्या आणि बस व रिक्षा स्टँडच्या पत्त्यात कोणताही बदल झालेला नाही. याबाबत रानबांबुळी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे आज रानबांबुळी सरपंच वसंत बांबुळकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांची भेट घेत प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या सर्व आस्थापनांच्या पत्त्यात सिंधुदुर्गनगरी असा उल्लेख करावा, अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयासाठी अधिसुचित ओरोस, रानबांबुळी, अणाव या गावातील काही क्षेत्राचे एकत्रिकरण करून त्यास “सिंधुदुर्गनगरी” असे नाव देण्यात आले. त्यामुळे या प्राधिकरण क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व कार्यालय, बस स्थानक रिक्षा स्थानक यांना सिंधुदुर्गनगरी असे नाव देण्याबाबत परिपत्रक शासनाने काढले आहे मात्र असे असतानाही आता २५ वर्षांचा कालावधीनंतरही काही कार्यालयाचे पते ओरोस सिंधुदुर्गनगरी असेच आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

याबाबत रानबांबुळी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे रानबांबुळी सरपंच वसंत बांबुळकर यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांची भेट घेत त्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. तसेच प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या सर्व आस्थापणांच्या पत्यात सिंधुदुर्गनगरी असा उल्लेख करावा अशी मागणी केली. आणि जर या कार्यलयाच्या फलकांवर बदल होणार नसेल किंवा शासन अधिसूचना व आपल्या परिपत्रकानुसार कार्यवाही होत नसेल तर ओरोस, रानबांबुळी. अणाव यांच्या हद्दी निश्चित करून हदी प्रमाणे ओरोस, रानबांबुळी व अणाव यांची नावे देण्यात यावीत. अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे. यावेळी ग्रामस्थ परशुराम परब, शुभम परब, प्रसाद गावडे आदी उपस्थित होते.

प्राधिकरण क्षेत्रात कार्यालयांच्या पत्यांची समस्या कायम आहे. शिवाय या क्षेत्रात अनेक समस्या आहेत. मात्र या कडे गावातील प्राधिकरण सदस्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केला आहे. त्यांच्याकडून कोणत्याही सूचना प्राधिकरण व्यवस्थापनाला केल्या जात नाहीत. त्यामुळे हे प्राधिकरण सदस्य बिनकामाचे असल्याचा आरोपही ग्रामस्थ परशुराम परब यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा