प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
कणकवली । प्रतिनिधी:
शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२१ चा निकाल १००% लागला आहे. सलग ९ व्या वर्षी शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव चा निकाल १००% लागला आहे हे विशेष. या प्रशालेतील एकूण ३३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्राविण्य ३३ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
*प्रशालेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालीलप्रमाणे…*
१)प्रथम – कु.तन्य संजय मुळीक (९४.६०%)
२)द्वितीय – कु.तुलसी राजेंद्र गावडे(९०.००%)
३)तृतीय – कु. तेजस्विनी मनोहर जाधव (८७.८०%)
गुणांनी प्रशालेत प्रथम तीन क्रमांक पटकविण्याचा मान मिळवला.
शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावचे शिवडाव सेवा संघ मुंबई तसेच प्रशालेचे मुख्यध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्तरातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.