आंबोली
आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात याही वर्षी देखील आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.
सुरूवातीपासून सतत १४ व्या वर्षी शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. परीक्षेला शाळेतून एकूण ३५ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ३२ विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता, ०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्तीण झाले आहेत. शाळेमधून यश सर्जेराव माने याने ८९ टक्के गुण मिळवून प्रथम, तन्मय मारूती मसकर ८७.६० टक्के गुण मिळवून व्दितीय तर आदित्य शिरीष पाटील याने ८७.४० टक्के गुण मिळवून तृतीय कमांक मिळवीला आहे.
१०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री. पि. एफ. डॉन्टस, सेकटरी श्री सुनिल राऊळ, श्री शिवाजी परब तसेच संचालक श्री. शंकर गावडे, श्री. जॉय डॉन्टस व सर्व संचालक व कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ सैनिक स्कूलचे कमांडंट कर्नल टी सुनिल सिन्हा, प्राचार्य श्री सुरेश तु. गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले आहे.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आंबोली ही सैनिकी मुल्ये व नीती तत्वावर आधारीत शासनमान्य इंग्रजी माध्यमाची अनुदानित निवासी सैनिक शाळा आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी इयत्ता ६वी ते १०वी व इयत्ता ११वी ते इयत्ता १२ वी विज्ञान शाखेकरीता रिक्त असलेल्या जागांसाठी प्रवेस अर्ज मागविण्यात येत असून इच्छूक विद्यार्थी / पालकांनी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली फोन नं. (०२३६३ ) २९९६१५ येथे संपर्क साधावा असे आवाहन