You are currently viewing आर. पी . डी . हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० %

आर. पी . डी . हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० %

सावंतवाडी :

सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज प्रशालेचा इ. १० वी मार्च २०२२ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून १२५ पैकी १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशालेची विद्यार्थीनी कु • वरदा तानाजी सावंत हिने ९८.६०% गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला . तसेच कु. आदिती दिनेश चव्हाण हिने ९७.२०% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकाविला . कु · समीर मयुरेश पटवर्धन ९६.२०% गुणांसह प्रशालेत तृतीय क्रमांक संपादन केला तसेच ९५ .०० % गुणांसह कु · अमृता मनोज विले व कु · राहूल झिलू गावडे या दोघांनी संयक्तपणे चौथा क्रमांक तर ९४.२० % गुणांसह कु · मधुरा मंदार पटवर्धन व कु . तेजस देवदास कोरगावकर यांनीही संयक्तपणे पाचवा क्रमांक पटकाविला. प्रशालेच्या निकालाची विशेष बाब म्हणजे ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणारे १४ विद्यार्थी तसेच ६५ विद्यार्थी विशेष प्राविण्यप्राप्त आहेत आणि संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणारे ०६ विद्यार्थी आहेत.

उत्कृष्ट निकाल देणा-या सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री . सी. एल. नाईक शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगांवकर यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा