सावंतवाडी प्रतिनिधी :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग द्वारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संप्रेषण साहित्य जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार व एनसीईआरटीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संप्रेषण साहित्य तयार करण्यासाठी शिक्षकांची ऑनलाईन स्पर्धा तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेली आहे.
तालुकास्तरावर आलेले प्रथम तीन क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात आले. समितीने परीक्षण करून एकूण पाच क्रमांक निश्चित केले. जिल्ह्यातून १२५ प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवला.
जिल्हास्तरावर प्राप्त तालुकानिहाय प्रथम तीन क्रमांक कुडाळ गौरी मंगेश वेर्लेकर, जि.प.शाळा आंब्रड ,भालचंद्र सुहास आजगावकर, जि.प.शाळा चेंदवण पडोशी,दर्शना विकास पारकर, जि.प.शाळा पाट .
कणकवली प्रवीण आशुतोष कुबल जि.प.शाळा शिडवणे क्र.१, नितीन पंडीत पाटील,जि.प.शाळा लोरे बांबर ,शर्वरी संजय गवस, जि.प.शाळा माईण उभाडे.
वैभववाडी अविनाश दत्तात्रय औटे जि.प.शाळा नाधवडे ब्राम्हणदेव, संतोष यशवंत मोहिते जि.प.शाळा बालभवन विद्यामंदिर मौंदे,दिलीप निवृत्ती माने, जि.प.शाळा केंद्रशाळा नाधवडे.
देवगड दीपक तानाजी डवर,
जि.प.शाळा सौन्दळे बाऊलवाडी,सुदेशभिकाजी गोलतकर,जि.प.शाळा तिर्लोट आंबेरी,हेमलता भास्कर जाधव, जि.प.शाळा साळशी क्र.१
मालवण विनित नरेंद्र देशपांडे, जि.प.शाळा चाफेखोल तोरसोळे,गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर,जि.प.शाळा मसुरे क्र.१,भाग्यश्री गोविंद वाडकर,जि.प.शाळा नांदोस गावकर
वेंगुर्ला ईश्वर हनुमंतराव थडके , जि.प.शाळा आरवली सखेलेखोल, वसुंधरा मुरारी सुर्वे,
जि.प.शाळा वजराट नंबर १, शंकर न्हानू जाधव,जि.प.शाळा आरवली टाक.
सावंतवाडी अमोल बाजीराव कोळी
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतर राष्ट्रीय शाळा चराठे,मनोहर वसंत परब,जि.प.शाळा शिरशिंगे मळई ,प्रियदर्शिनी सुनील जाधव जि.प.शाळा गाळेल
दोडामार्ग शुभांगी संतोष बाबर,
जि.प.शाळा हेवाळे क्र.१,रामा भिवा गवस,
जि.प.शाळा केर क्र.१, दिग्विजय नागोजी फडके जि.प.शाळा साटेली भेडशी,अरुण वसंत पवार,जि.प. शाळा तळकट
जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती ने परीक्षण करून आलेले प्रथम ५ क्रमांकात प्रथम विनीत नरेन्द्र देशपांडे,जि.प.शाळा चाफेखोल तोरसोळे
तालुका-मालवण, द्धितीय ईश्वर हणमंतराव थडके जि. प. शाळा आरवली सखेलेखोल
तालुका- वेंगुर्ला, तृतीय अमोल बाजीराव कोळी
अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे क्र.१तालुका – सावंतवाडी, चतुर्थ शुभांगी संतोष बाबर जि.प.शाळा हेवाळे तालुका-दोडामार्ग,नितीन पंडित पाटील जि.प.शाळा लोरे बांबरवाडी तालुका – कणकवली, पाचवा गौरी मंगेश वेर्लेकर
जि. प.शाळा आंब्रड बाजारतालुका-कणकवली
यांची निवड करण्यात आली आहे.
येत्या १५ ऑक्टो पर्यंत राज्यस्तरावर १० क्रमांक निवडून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवले जाणार आहेत.या श्री.विजय धामापूरकर विषयसहाय्यक तथा सदस्य ,श्रीम.सुषमा कोंडूसकर अधिव्याख्याता तथा सहाय्यक विभाग प्रमुख,श्री.अरुण पाटील, जिल्हा नोडल अधिकारी तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ प्रकाश जाधव यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना डॉ प्रकाश जाधव म्हणाले,राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर जे साहीत्य तयार झालेले आहे या १२५ साहीत्यापैकी तालुका व जिल्हास्तरावर निवड झालेल्या साहीत्याचे अभ्यास माला ऑनलाईनद्वारा जिल्हयातील शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल याचा लाभ घेवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० समजण्यास मदत होईल त्यातून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल.