You are currently viewing मानवती

मानवती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांची अप्रतिम काव्यरचना*

*मानवती :-*
*गाललगा गाललगा गाललगा*

छान अशा आठवती आठवणी
सुंदर होत्या सगळ्या बालपणी

खेळ किती खेळत होतो सगळे
भांडण झाले तर ती मन धरणी

रम्य तशी सांज सख्या आठवुनी
आज मनाला बघ करते तरणी

हर्षविते आज मला वेळ तशी
जे सुख होते मजला वरकरणी

बावरला जीव पहा आज इथे
फक्त तुला ना कळले त्याच क्षणी

शोभा वागळे
मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा