You are currently viewing हिंदुत्ववादी संघटनांचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

हिंदुत्ववादी संघटनांचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

इस्लामिक जिहादी संघटनांवर कारवाईसाठी मागणीचे निवेदन सादर

देशातील वाढत्या हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता इस्लामिक जिहादी संघटनांवर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद , बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने
आज गुरुवारी इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.तत्पूर्वी , हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर प्रार्थना ,मंञ म्हणत तसेच जातीय हिंसाचार घडवून आणणा-या इस्मालिक जिहादी
संघटनांवर कारवाई करावी ,अशा जोरदार घोषणा देत मागणी केली.यावेळी राष्ट्रपती महोदयांना आपल्या मागण्या कळवण्यात याव्यात , यासाठी प्रांत कार्यालयास मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक जिहादी कट्टरता वाढत असून निरपराध हिंदुंवर पध्दतशीरपणे हल्ले होत आहेत.याशिवाय रामनवमी
व हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक करत हिंदुंवर हल्ले करण्यात आले आहेत.त्यामुळे हिंदु समाज बांधवांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वीच हिंदूंची घरे , दुकाने आणि वाहने पेटवून मोठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याशिवाय पोलिसांवरही हल्ले करत सरकारी मालमत्ता आणि मंदिरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.या सर्व घटनांना इस्लामिक जिहादी संघटनाच जबाबदार असून यामुळे देशातील हिंदु बांधवांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.याच पार्श्वभूमीवर देशातील वाढत्या हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता इस्लामिक जिहादी संघटनांवर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद , बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने
आज गुरुवारी इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.तत्पूर्वी , हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर प्रार्थना ,मंञ म्हणत तसेच जातीय हिंसाचार घडवून आणणा-या इस्मालिक जिहादी
संघटनांवर कारवाई करावी ,अशा जोरदार घोषणा देत मागणी केली.यावेळी राष्ट्रपती महोदयांना आपल्या मागण्या कळवण्यात याव्यात , यासाठी प्रांत कार्यालयास मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात ,नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडून हिंदुंवर हल्ले करणा-यांवर कारवाई करावी ,मौलवींच्या प्रक्षोभक भाषणावर बंदी घालावी ,धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी , देशात हिंसाचार पसरवणाऱ्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तबलिगी यासारख्या कट्टरपंथी संघटनांवर तात्काळ बंदी घालावी ,हिंदू अल्पसंख्यांकांची सुरक्षा व्यवस्था करावी अशा विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.या धरणे आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंञी विजय पाटील , शहराध्यक्ष बाळासो ओझा ,शहर मंञी प्रविण सामंत , पंढरीनाथ ठाणेकर , मुकेश दायमा ,अमित कुंभार ,राजेश व्यास , बजरंग दलाचे संतोष हत्तीकर ,मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर ,योगेश तिवारी ,
दत्ता पाटील ,गजानन जाधव , मुकेश बाहेती ,राहुल बोहरा , रावसाहेब चौगुले , मुकुंद उरुणकर , मारुती शिंगारे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा