You are currently viewing कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी दादा कुडतरकर यांची निवड

कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी दादा कुडतरकर यांची निवड

उपाध्यक्षपदी मनोहर पालयेकर, सचिवपदी विलास चव्हाण तर खजिनदारपदी विश्वनाथ केरकर यांची निवड

कणकवली :

कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सिताराम उर्फ दादा कुडतरकर, उपाध्यक्षपदी मनोहर पालयेकर, सचिवपदी विलास चव्हाण तर खजिनदारपदी विश्वनाथ केरकर यांची तर सल्लागारपदी प्रा. पी. जी. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

कणकवली येथील महाराजा मंगल कार्यालयात तालुका पेंशनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्रा. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा पेंशनर्स सेवा संघाचे मनोहर आंबेरकर, जिल्हा उपकोषागार अधिकारी प्रमोद चिंदरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. चिंदरकर यांनी सेवानिवृत्ती दारकांना शासनाने दिलेल्या लाभाची माहिती दिली. तर श्री. आंबेरकर यांनी कणकवली पेंशनर्सची मोठी ताकद आहे. म्हणून त्यांनी स्वत:ची इमारत उभारली हे कौतुकास्पद आहे, असे सांगितले. तर श्री. पालयेकर यांनी २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही पेंशन मिळाली पाहिजे, तो त्यांचा हक्क असल्याचे संगितले.

यावेळी दादा कुडतरकर, मोहन सावंत, परशुराम साधले यांनी विचार मांडले. प्रास्ताविक पी. जी. पाटील यांनी केले. इतिवृत्त वाचन भिकाजी जामदार यांनी तर सुत्रसंचालन विश्वनाथ केरकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा