दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर..
मुंबई
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी १:०० वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी, तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनींचा समावेश होता. दरम्यान परीक्षा नंतर दहावीचा निकाल केव्हा लागेल…? याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. तर आठवड्याभरापूर्वी लागलेल्या बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालाची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे. हा निकाल उद्या दुपारी १:०० वा. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार असून त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.