जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना
होऊन जाऊ दंग श्रीकृष्ण नामांत
भिजून जाऊ राधाकृष्ण रंग रंगांत।।ध्रु।।
भारावतो ऐकून मुरलीचा नाद
शहारे अंग,कान्हा तव अस्तित्वांत
वाटे प्रसन्न सृष्टी जाई भारावून।।1।।
रूप तुझे दिसावे जळी स्थळी सर्वत्र
साठवतो प्रतिमा हृदयमंदिरात
मृगजळ न व्हावे मूर्ती दिसूदेत।।2।।
बाळ गोपाळांचा मेळा पहात वाट
गोपगोपी आसुसले तव दर्शनार्थ
रासक्रीडेसाठी सर्व थांबले तिष्ठत।।3।।
तुझ्या कृष्ण लीला भावती रुचतात
खोडकरपणा तुझ्या अंगांत रोमांत
तू प्रेमाचे प्रतीक याचितो आशीर्वाद।।4।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.पिन. 410201.
Cell.9373811677.