You are currently viewing कुडाळ एम्. आय. डि. सी. असोसिएशन अध्यक्षपदी मोहन होडावडेकर, कार्यवाह म्हणून अॅड. नकुल पार्सेकर यांची निवड

कुडाळ एम्. आय. डि. सी. असोसिएशन अध्यक्षपदी मोहन होडावडेकर, कार्यवाह म्हणून अॅड. नकुल पार्सेकर यांची निवड

कुडाळ :

कुडाळ एम्. आय. डी. सी. असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १५ जुन २०२२ रोजी असोसिएशनच्या संकुलात पार पडली. यावेळी असोसिएशनचे सुमारे दीडशेहून जास्त सभासद उपस्थित होते. उपस्थित सर्व सभासदांच्या सहमतीने असोसिएशनच्या अध्यक्षपदी सामाजिक उद्योगाचे चेअरमन तथा काॅनबॅक या राष्ट्रीय संस्थेचे कार्यकारी संचालक श्री मोहन होडावडेकर तर असोसिएशनच्या कार्यवाहपदी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व कोकण स्फुर्तीचे संचालक अॅड नकुल पार्सेकर यांची पुढील तीन वर्षासाठी एकमताने निवड केली.

सुरवातीला मावळते अध्यक्ष श्री आनंद बांदिवडेकर यांनी आपल्या पाच वर्षांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत असोसिएशन साठी केलेल्या रचनात्मक कामाचा आढावा घेतला व सर्व सहकारी आणि सभासद यांनी केलेल्या सहकार्या बद्दल आभार मानले.

सभेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी श्री कमलाकांत परब यांनी काम पाहिले. सर्वाच्या संमतीने त्यांनी कार्यकारी मंडळ व पदाधिकारी यांची घोषणा केली.

अध्यक्ष- श्री मोहन होडावडेकर, उपाध्यक्ष- श्री नितीन पावसकर, कार्यवाह- अॅड. नकुल पार्सेकर, सहकार्यवाह-श्री कुणाल वरसकर खजिनदार-श्री उदय शिरोडकर, उपखजिनदार- श्रीमती सिद्धी बिरमोळे, सदस्य- आनंद बांदिवडेकर, श्री उमेश गाळवणकर, श्री संजीव प्रभू, श्री अमीत वळंजू, श्री संतोष वारखंडकर, श्री मुश्ताक भाई शेख, श्री किशन बिश्नोई, श्री प्रमोद भोगटे, श्री राजन नाईक, श्री व्यंकटेश भंडारी, सल्लागार- कमलाकांत परब, द्वारकानाथ धुरी, राजाराम गवस, शशिकांत चव्हाण, नुतन अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना श्री मोहन होडावडेकर यांनी संघटनात्मक बळकटीकरण व उद्योजकांच्या सामुहिक समस्याना प्राधान्याने सोडविण्यासाठी नुतन कार्यकारी मंडळ प्राधान्य देईल. उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्या क्लिष्ट अटी दुर करण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक असून त्यासाठीही प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.

नुतन कार्यवाह नकुल पार्सेकर यांनी अनियमित आणि कमी दाबाने केला जाणारा विद्युत पुरवठा ही उद्योजकांची फार मोठी समस्या असून त्यासाठी सामुहिक प्रयत्नाने नवीन कार्यकारी मंडळ ठोस निर्णय घेईल असे सुतोवाच केले. यावेळी जेष्ठ उद्योजक श्री कमलाकांत परब व श्री द्वारकानाथ धुरी यांनी आपले मनोगत मांडले. नुतन सहकार्यवाह श्री कुणाल वर्कर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा