कणकवली
कणकवली तालुक्यातील असलदे शिवाजी नगर येथील पोकळे कुटुंब यांच्या घरात जवळपास अडीच ते तिन फुटी लांब सर्प आढळून आला.तातडीने असलदे सरपंच तथा सर्पमित्र म्हणून परिचित असलेले पंढरी वायंगणकर यांना बोलावले.त्यांनी त्या नागराजाला जिवंत पकडले व जंगलमय भागात सोडून दिले आहे.या आधीही बरेच सर्पांना जिवदान दिले आहे. यामुळे सर्पमित्र सरपंच पंढरी वायंगणकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .