मालवण :
तालुक्यातील मसुरे बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव २२ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. दोन वर्षे कोरोना निर्बंध असल्याने सदर जत्रोत्सव गाव मर्यादित झाला होता. यावर्षी मात्र सर्व भक्तांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.
जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी विधीवत पूजन झाल्यानंतर भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे. पावसाळ्यामध्ये होणारा हा एकमेव जत्रोत्सव असून मोठ्या प्रमाणात भाविक या जत्रोत्सवात उपस्थितीदर्शवतात.भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणे, तसेच ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सातेरी देवालय ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.