You are currently viewing ७ वर्षीय अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल

७ वर्षीय अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल

रत्नागिरी :

 

लांजा तालुक्यातील कोर्ले सरकारवाडी येथील सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आर्या राजेश चव्हाण तिने शनिवारी ११ जून रोजी रात्री राहत्या घरात भिंतीला असलेल्या खिळ्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या अल्पवयीन मुलीने केलेल्या आत्महत्या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी गंभीर दखल घेतली असून सोमवारी १३ जून रोजी सायंकाळी कोर्ले सरकारवाडी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

या प्रकरणाबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी कोर्ले सरकारवाडी येथे सोमवारी सायंकाळी आर्या चव्हाण तिच्या घरी जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस तपासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी निवास साळोखे, लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे, या पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक आणि या घटनेच्या तपासी अधिकारी तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा