सावंतवाडी
मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत व सुप्रीम कोर्टाचे आदेश तंतोतंत पालन करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती .आणि भोंगे उतरविण्यासाठी ४मे चा अलटीमेट दिला होता.त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदींवरचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या .मुंबईतील ९२% टक्के मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र आवाजाचे पालन व बऱ्याच ठिकाणी भोंगे उतरवण्यात आले.या बाबत जनजागृती करण्यासाठी मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सावंतवाडी मध्ये घरोघरी पत्रके वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला घरोघरी जाऊन पत्र वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी मनसेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार बांदा शहरअध्यक्ष बाळा बहिरे उपशहरअध्यक्ष शुभम सावंत सचिव आकाश परब लॉटरीसेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर विभाग अध्यक्ष नाना सावंत ग्रा.प.सदस्य आदेश सावंत शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे निलेश मुळीक महाराष्ट्र सैनिक बाबु राऊळ मनोज कांबळी आदी उपस्थित होते.