You are currently viewing मालवाहू रेल्वेखाली आत्महत्या

मालवाहू रेल्वेखाली आत्महत्या

*महिलेची ओळख पटली….*

 

सावंतवाडी:

 

मळगाव येथील कोकण रेल्वे ब्रिज खाली रेल्वे ट्रॅकवर अज्ञात महिलेचा मृतदेह काल सोमवारी आढळून आला होता. तीची ओळख पटली असून ती मालवण तालुक्यातील चिंदर येथील पेट्रोल पंप मालकीण असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी म्हटले आहे. तीचे नाव श्रीमती ज्योती शशीकांत गोलतकर (७४) असे आहे.

काल सोमवारी दुपारच्या सुमारास एका मालवाहू ट्रेनच्या इंजिन ड्रायव्हरला मृतदेह निदर्शनास पडला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ रेल्वे स्थानक प्रमुखांना दिली. त्यानुसार त्यांनी घटनेची खबर पोलिसांना दिली. सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

संबंधित महिलेच्या अंगावर हिरव्या रंगाची साडी आहे. तर तिचा चेहरा छिन्ह-विछिन्ह झाला आहे. त्यामुळे तिची ओळख पटण्यात अडथळे येत होते.

मालवण तालुक्यातील चिंदर येथील पेट्रोल पंप मालकीण श्रीमती ज्योती शशीकांत गोलतकर (७४) असल्याचे पेट्रोल पंप मॅनेजर यांनी ओळखले, असे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगितले.

श्रीमती ज्योती शशीकांत गोलतकर मुंबई येथे गेली होती. मात्र सावंतवाडी पर्यंत कशाला आली? याबाबत नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नातेवाईकांकडे चौकशी केली जाईल असे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा