You are currently viewing वटसावित्री

वटसावित्री

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री. अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

करिन मी पूजा, …. हो हो करीन मी पूजा
व्रत वटसावित्री पूजेचे
युगा युगाच्या संस्कारांचे
लेणे पावन परंपरेचे
उगाच कुणीही खिल्ली उडवुनी कां मारावी मजा?
करीन मी पूजा…..
नव्या युगाची मी ही युवती
कुलवन्ता घरची कुलवंती
अंतरात जागविते प्रीती

भाव भावना उदात्त आमुच्या कां वाटावी सजा?
करीन मी पूजा…….
गुढी पाडवा, लक्ष्मी पूजन
भाऊबीज अन रक्षा बंधन
कुलाचार कुळधर्मा पालन
प्रथा रूढींचा ठेवा कां करता आयुष्यातून वजा?
करीन मी पूजा……
नसेल कोणी सत्यवान कीं
नासूद्या कोणी राम जानकी
पती माझा मज जीव प्राण कीं
माझ्या सौभाग्याचे शुभचिंतन अधिकारच माझा
करीन मी पूजा….
वटवृक्षाचे प्रतीक जीवनी
कुल समृद्धी जन संजीवनी
वैज्ञानिक ही महत्व जाणी
तसेच प्रेम निरंतर वाढावे याहून हेतू नसे दुजा
करीन मी पूजा…
कथा न केवळ सावित्रीची
ती तर स्त्रीच्या सामर्थ्याची
कळी काळासही जिंकायाची
पुढारलेपण आव फुकाचा सत्य नसे समजा
करीन मी पूजा…. हो हो करिन मी पुजा

अरविंद
24/6/21

प्रतिक्रिया व्यक्त करा