शाखा अभियंता, महावितरण शाखा कार्यायल पणदूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कुडाळ:
भारतीय जनता पार्टी बुथ कमिटी, पणदूरच्या वतीने सरपंच दादा साईल आणि बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल यांच्या नेतृत्वाखाली कोरोना कालावधीत भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे महावितरणचे छुपे विज दरवाढ व विजबील भरणा केंद्रा संदर्भातील अडचण ह्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज शाखा अभियंता, महावितरण शाखा कार्यायल पणदूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
पणदुर, वेताळ-बांबर्डे, अणाव, हुमरमळा व डिगस या पंचक्रोशितील कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे महावितरण कंपनीकडून घरगुती विज बिलासाठी नियमित मीटर रिडींग न घेतल्याने माहे मार्च ते माहे सप्टेंबर 2020 पर्यंतची विज बिले ही सरासरी पद्धतीने कंपनीकडून काढण्यात आलेली आहेत. सदरची विज बिले ही सरासरीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे ग्राहकांच्या माथी विनाकारण जादा विज बिलांचा र्भुदंड पडलेला आहे ती कमी करून मिळण्यासाठी तसेच विज बिले दुरुस्त करणेसाठी व भरणा करणेसाठी पणदूर पंचक्रोशीतील ग्राहकांना ओरोस किंवा कुडाळ येथील महावितरण कंपनी कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे विज बिल दुरुस्ती व विजबिल भरणा केंद्र हे महावितरण कंपनीच्या पणदूर येथील शाखा कार्यालय तात्काळ सुरु करणेत यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी अनाव ग्रामपंचायत सदस्य विनायक अनावकर, भाजप उप तालुकाध्यक्ष जगदीश उगवेकर, माजी सरपंच श्यामसुंदर सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत साईल, रमेश राणे, आनंद राऊळ, डॉ अरुण गोडकर, मोहन मयेकर, अरविंद साईल, भगवान साईल, सुदर्शन मयेकर, नागेश कुबल, सुधीर घोगळे,सागर चोरगे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.