You are currently viewing मा. राज साहेब ठाकरे यांचा वाढदिवस कुडाळ तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा

मा. राज साहेब ठाकरे यांचा वाढदिवस कुडाळ तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकारे यांचा जन्म दिवस कुडाळ येथे सामाजिक उपक्रमातुन साजरा करण्यात आला. यावेळेस एक हजार वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प केला गेला. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखालील कुडाळ तालुका प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या माध्यमातून याचे आयोजन केले होते.

वृक्ष तोडीच्या तुलनेत वृक्ष लागवड होत नाही,तसेच पर्यावरणचा समतोल राखावा, जमिनीची धुप थांबावी म्हणून हा उपक्रम घेतल्याचे या वेळेस उपस्थितीतांनी सांगितले तसेच तालुक्यातील नेरुर गावातील चौखुर्ण मंदिर परिसरात मनसे लाॅटरी विक्रेता संघटणा अध्यक्ष गणेश कदम यांच्या माध्यमातून दोन सोलर लाईट बसविण्यात आल्या.. उपशाखाअध्यक्ष रमेश जोशी व अक्षय जोशी यांच्या मागणीतुन या सोलर लाईट देण्यात आल्या. याचे उद्घाटन एसी टी कामगार सेना उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

आजच्या कार्यक्रमातमा.संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्य जगन्नाथ गावडे , ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब , राजेश माने ,सागर सावंत, अजय जोशी,सर्वेश ठाकूर,अनिकेत ठाकूर,रोहित नाईक,सुनील शेडगे,सागर धुरी आदी पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते..

 

प्रतिक्रिया व्यक्त करा