सावंतवाडी
कसाल येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या, राजा शिवछत्रपती वक्तृत्व स्पर्धेत नील नितीन बांदेकर याने लहान गटातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला .
या स्पर्धेत लहान गटात जिल्हाभरातून एकूण 31 स्पर्धक सहभागी झाले होते. त्याचबरोबर नुकत्याच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या, वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा नील बांदेकर याने लहान गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता.
आतापर्यंत नीलने वक्तृत्व ,कथाकथन, वेशभूषा, गीत गायन, नृत्य, मॉडेलिंग यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सुमारे १०६ स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.आणि यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.
या यशाचे श्रेय तो आपले आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर, केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर आणि आजी आजोबा तसेच मामा-मामी यांना देतो.
नील हा केंद्र शाळा नंबर 1 मध्ये, इयत्ता चौथी मध्ये शिकत असून शाळेतील समस्त शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांचे त्याला अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
बांदा गावचे सरपंच अक्रम खान आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर तसेच विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे