You are currently viewing श्री. सत्यवान रेडकर यांचे सिंधुदुर्ग वासीयांसाठी २५ व २६ जून रोजी शतकोत्तर निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला

श्री. सत्यवान रेडकर यांचे सिंधुदुर्ग वासीयांसाठी २५ व २६ जून रोजी शतकोत्तर निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला

तिमिरातुनी तेजाकडे ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात राबविणारे शिक्षण प्रसारक यांचे खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे मालवण, कणकवली तसेच कुडाळ तालुक्यात शतकोत्तर व्याख्यान आयोजित केली गेली आहेत. तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचा उद्देश्य विविध प्रशासकीय पदांवर आपले महाराष्ट्रातील विशेषकरून कोकणातील विद्यार्थी दिसावेत यासाठी विविध ठिकाणी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता, आवड निर्माण करून त्यांना विविध माध्यमांद्वारे संपर्कात ठेवून मार्गदर्शन प्रदान करणे होय. सात शैक्षणिक अर्हता धारण केलेले, कर्मचारी चयन आयोगातर्फे (SSC) २०१७ च्या JHT परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर १६६ व्या क्रमांकावर त्यांची निवड होऊन मुंबई सीमाशुल्क विभागात कार्यरत असलेले कोकणचे सुपुत्र, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क यांच्या शतकोत्तर व्याख्यानांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेः

*मालवण तालुका व्याख्यानमाला (शनिवार दिनांक २५ जून २०२२)*
१) सकाळी ८.३० वाजता, ओझर विद्यामंदिर, कांदळगाव
२) सकाळी ११.३० वाजता, कै. नरहरी गणेश प्रभूझांट्ये सभागृह, स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण
३) दुपारी २.०० वाजता, टोपीवाला हायस्कूल, मालवण मध्यवर्ती सभागृह, मालवण (व्याख्यान क्रमांक १०१, १०२,१०३)

*कणकवली तसेच कुडाळ तालुका व्याख्यानमाला (रविवार, दिनांक २६ जून २०२२)*
४) सकाळी ९.०० वाजता, नगर वाचनालय, कणकवली
५) दुपारी १.०० वाजता, न्यू शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, जांभवडे, तालुका कुडाळ (व्याख्यान क्र. १०४ व १०५)

विद्यार्थी व पालकवर्गाने जास्तीत जास्त या निशुल्क व्याख्यानांचा लाभ घ्यावा व काहीही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास 9969657820 या वैयक्तिक क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 12 =