You are currently viewing आमचं वजन कमी पडलं काय

आमचं वजन कमी पडलं काय

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

सर्वांना हक्काचे आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. लहान वयातच मुलांना शाळेची ओढ शिक्षणाची आवड लागावी यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक गावात ०/६ वयोगटातील मुलांच्या साठी अंगणवाडी ही संकल्पना शासनाने अमलात आणली. अंगणवाडी मुळे लहान मुलांची आई वडील मजूर गरिबी असल्यामुळे मुलांना चांगले सकस अन्न देण्यास असमर्थ असल्यामुळे कुपोषण सारखी समस्या आपणास भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने अंगणवाडी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना सकस खाऊ दुध वाटप मुलांचीही अंत्यंत व्यवस्थित संगोपन करण्याचे काम अंगणवाडी माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस करत असतात. आजची मुलं आपल्या देशांचे उद्याचे भविष्य आहे. डॉ वकील इंजिनिअर क्लास वन अधिकारी. वैधानिक. शास्त्रज्ञ. हे यात नसतील कशावरून आपणांस याचा विचार करणं गरजेचं आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर हे गाव त्या इस्लामपूर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये सलग पाच वर्षे पत्रव्यवहार करत असलेलें बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे हे याच परिसरात रहिवासी आहेत. या परिसरात कर्तव्य शिल नगरसेवक आहेत. या उपनगराला राजेबागेसवारनगर असं नाव आहे. यामध्ये जवळपास १००० पेक्षा जास्त कुटुंब वास्तव्यास आहेत.या संख्येच्या तुलनेत यामध्ये जवळपास मजूरी करणारे. एम आय डी सी कामगार. मिळेल ते काम करणारे कामगार. या परिसरात रहिवासी आहेत. मग आई वडील दिवसभर पोटाच्या माग गेल्यावर त्याची ०/६ वयोगटातील मुल दिवसभर उन्हात फिरणार. या परिसरापासून अंतरावर असणारी अंगणवाडी जाण्यासाठी हम रस्ता ओलांडून जावे लागत आहे त्यामुळे मुलांना येणे जाणे करणे व पालकांना सुध्दा ते त्रासाचं होणार आहे याचे कारण आहे ते म्हणजे या परिसरात अंगणवाडी नाही . सर्व शिक्षा अभियान व ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचविणे धोरणानुसार सर्वांना शिक्षण मिळावे या उद्देशाने या परिसरात अंगणवाडी ची गरज निर्माण झाली आहे. सवता परिसरात फिरून या परिसरातील लोकांची समक्ष भेट घेऊन व आपणांस अंगणवाडी कशासाठी पाहिजे हे समाजावून सांगून जवळपास १३४ कुटुंबाच्या सह्या घेतल्या आणि पहिलें निवेदन १५/७/२०१७ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर चे मुख्य अधिकारी यांना दिले. दुसरे अंगणवाडी मागणी निवेदन १५/७/२०१७ रोजी मा इस्लामपूर नगरपरिषद नगर अध्यक्ष सो यांना दिले. तिसरे अंगणवाडी मागणी निवेदन १३/७/२०१७ रोजी मा समिती सदस्य कला क्रिडा शिक्षण सांस्कृतिक समिती सदस्य इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर. १३/७/२०१७ रोजी अंगणवाडी मागणी निवेदन मा सभापती सो कला क्रीडा शिक्षण सांस्कृतिक समिती इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर. २०/७/२०१७ रोजी अंगणवाडी मागणी निवेदन मा उपनगराध्यक्ष इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर
. १८/७/२०१७ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांचेकडून जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी नागरि विभाग सांगली यांना सुध्दा पत्रव्यवहार करण्यात आला होता. वेळोवेळी स्मरण पत्र इस्लामपूर नगरपरिषद यांना अहमद मुंडे यांनी दाखल केली होती .
सांगली जिल्हा पालकमंत्री यांनी प्रत्येक प्रभागात अंगणवाडी असा एक अनोखा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला मला बर वाटल पाच वर्षांपासून अडकून पडलेला अंगणवाडी प्रस्ताव व राजेबागेसवार प्रभाव क्रमांक १ मधील लोकांच्या मागणीला आत्ता न्याय मिळणारं असं वाटलं म्हणून ४/५/२०२२ रोजी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांना सवता भेटून अहमद मुंडे यांनी निवेदन दिले. आमच्या निवेदनाचा विचार व दखल घेऊन मंत्री महोदय यांनी दिनांक ७/५/२०२२ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांच्या नांवे खालील मजकूर असलेलं पत्र जारी केलं त्यामध्ये इस्लामपूर प्रभाग १ मधील राजेबागेसवार नगरमध्ये नवीन अंगणवाडी मंजूर करण्याबाबत बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचा दिनांक ४/५/२०२२ रोजीचा अर्ज विचारात घेऊन व सोबत जोडलेल्या निवेदन यावरुन रोजंदारी कामगारांच्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने इस्लामपूर राजेबागेसवार नगरमध्ये नवीन अंगणवाडी सुरू व्हावी अशी विनंती सदर परीसरातील नागरिकांची आहे.तरि याबाबत आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही तात्काळ व्हावी असं पत्र मंत्री महोदय यांनी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांना केली होती .
इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांच्या कडे हे पत्र १०/५/२०२२ रोजी आवक जावक खात्यातून देण्यात आले आहे. ज्यांना पाच वर्षांत जे झालं नाही आमची पाच वर्षांचा पत्रव्यवहार केराच्या टोपलीत टाकला असावा कारण नगरपरिषद इस्लामपूर नगरपरिषद कडून आजपर्यंत साधी चौकशी सुध्दा करण्यात आली नाही म्हणून आम्ही पालकमंत्री व मंत्री महोदय यांचा आसरा घेतला पण आज सुध्दा तशीच परिस्थिती आहे. कोणालाही पत्रव्यवहाराचे गांभीर्य नाही साधी चौकशी नाही अशी पत्र येतात किती आणि आम्ही केरात टाकतो किती हा तर सर्वसामान्य लोकाचा जाणूनबुजून केलेला अपमान आहे. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे इस्लामपूर सारख्या शहरात जागेचे दर असमानाला ठेकले आहेत. त्यातच जर एकादी व्यक्ती समाजसेवा म्हणून अंगणवाडी सारख्या उपक्रमास जागा देण्यास तयार झाल्यास त्या व्यक्तिच्या पायात हस्तांतर नावांचा भला मोठा साप सोडला जातो. म्हणजे जागा देणारा सुध्दा पाय माग घेतो हे कीतपत योग्य आहे मलातरी कळतं नाही तुम्हाला कळतंय का बघा
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा