परिवार संवाद कार्यक्रम
वेंगुर्ले
सोमवार दिनांक १३ जुन रोजी दुपारी १ = ०० वाजता वेंगुर्ले शहरातील भटवाडी येथील भाजपा चे जुणे – जाणते पदाधिकारी रविंद्र शिरसाठ यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक यांनी भाजपा परिवारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामध्ये जनसंघापासुन ते आता भाजपा मध्ये असलेले कार्यकर्ते , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते , विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी , अखिल भारतिय विद्यार्थी परिषद , भारतीय किसान संघ , भारतीय मजदूर संघ , ग्रामविकास , शिक्षक परिषद , ग्राहक पंचायत , सहकार भारती इत्यादी परिवारातील मंडळीं उपस्थित होती .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभु रामचंद्र च्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते अनंत आठले यांच्या हस्ते केंद्रीयमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी डाॅ. राजन शिरसाठ यांनी पण मंत्री मोहदयांचे स्वागत केले .
यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांनी मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली .तसेच मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले . त्याचप्रमाणे जनसंघापासुन आता पर्यंत भाजपा परिवारातील मंडळीनी कठोर परिश्रम घेतले त्यामुळे आत्ताचे दिवस पहायला मिळाले असे उद्गगार काढले.
यावेळी मान्यवर म्हणून भाजपा चे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चे संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी , महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे , प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण , जेष्ठ नेते राजु राऊळ , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , सावंतवाडी नगराध्यक्ष संजु परब व्यासपीठावर होते .
या बैठकीस विश्व हिंदु परिषदेचे अरुण गोगटे व गिरीष फाटक व आप्पा धोंड , साईप्रसाद नाईक , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , अॅड. सूर्यकांत खानोलकर , बाळा सावंत , बाबा राऊत ,दिपक भगत , संदीप खानोलकर , भारतीय मजदूर संघाचे वासुदेव जोशी , विनोद लोणे , संजय शिरसाठ , डाॅ.दर्शेश पेठे , किसान मोर्चाचे गुरुनाथ पाटील , अमित नाईक , प्रकाश करंगुटकर , अनंत नेरुरकर , दिनेश आचार्य , अजित राऊळ सर , अभाविप चे रफीक शेख , प्रदिप कुबल , प्रशांत प्रभुखानोलकर , बाबली वायंगणकर , संदीप पाटील , रविंद्र शिरसाठ , किरण शिरोडकर , नितीन रुडाणी , नगरसेवक प्रशांत आपटे , सुनील नांदोसकर , नवनाथ सातार्डेकर , शेखर काणेकर , समीर नाईक , मिलिंद पिंजाणी , बाळा शिरसाठ इत्यादी उपस्थित होते
१९५२ ते १९८० या खडतर काळात ज्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे जनसंघ व भाजपा ची वाढ झाली अशा कार्यकर्त्यांच्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ” परिवार संवाद ” कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे आभार प्रदर्शनात प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .