You are currently viewing अमृत सरोवर अभियानांतर्गत 75 सरोवरांचे मॅपिंग करा

अमृत सरोवर अभियानांतर्गत 75 सरोवरांचे मॅपिंग करा

15 सरोवरांच्या कामाला सुरुवात करा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

अमृत सरोवर अभियानांतर्गत जिल्ह्यातील 75 सरोवरांचे मॅपिंग तात्काळ करुन 15 सरोवरांच्या निर्मितीच्या कामास सुरुवात करा असे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.

                अमृत सरोवर आणि जलशक्ती अभियानाच्या कामाबाबत नोडल अधिकारी केंद्र शासनाचे शिक्षण संचालक जे.पी. पांडे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधून आढावा घेतला. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उपस्थित अधिकाराऱ्यांना सूचना दिल्या.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा संधारण अधिकारी द.यो. दामा, जिल्हा जलसंधारण अधिकारी उदयकुमार महाजनी, मजिप्राचे कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर आदी उपस्थित होते. तसेच केंद्र शासनाचे सहसचिव अंशु सिंन्हा, अवर सचिव दलबीर सिंह, तांत्रिक सल्लागार शिंपी जितेंद्र सहभागी झाले होते.

                नोडल अधिकारी श्री. पांडे म्हणाले, शाळांमध्ये या अभियानाबाबत जनजागृती करावी. सर्वांनी चांगल काम करावे, आमच्याकडून सर्व सहकार्य करण्यात येईल. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, नव्या इमारतीचा बांधकाम परवाना देताना ग्रीन बिल्डींगचे निकष पाहण्याबाबत सूचना द्यावी. अमृत सरोवर अभियानांतर्गत जिल्ह्यातील 75 सरोवरांचे मॅपिंग तात्काळ करुन 15 सरोवरांच्या निर्मितीच्या कामास सुरुवात करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा