You are currently viewing सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणखी एक अजब प्रकार- अजित नाडकर्णी

सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणखी एक अजब प्रकार- अजित नाडकर्णी

फोंडाघाट

देवगड निपाणी रस्ता राज्यमार्ग फोंडाघाट हवेली नगर लोरे फाटा ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट रस्त्याची चाळण झालेली आहे. वाहन घेऊन जाणे तसेच चालत जाणे हे अवघड झाले आहे. या राज्य मार्गाच्या दुरावस्था संदर्भात माजी ग्रामपंचायत सदस्य फोंडाघाट तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नोटीस दिली होती. रस्त्याची डागडुजी न झाल्यास बुधवारी 15 रोजी पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा नाडकर्णी यांनी दिला होता.

या आंदोलनाचे पत्र मिळताच सार्वजनिक बांधकाम ने गटार साफ करण्याच्या बहाण्याने गटारातील माती रस्त्यावर टाकल्याने रस्ता आणखीनच खराब झाला आहे. त्यामुळे बुधवारी 15 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम हवेली नगर याठिकाणी करण्यात येणार आहे. यावेळी गटारातील माती रस्त्यावर का टाकली याचाही जाब अजित नाडकर्णी विचारणार आहेत. हे आंदोलन सर्व पक्षीय असून याला शाखाप्रमुख विजय जामदार राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − one =