You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव फाटा येथे दोन फोर व्हीलरची जोरदार धडक

मुंबई-गोवा महामार्गावरील ओटव फाटा येथे दोन फोर व्हीलरची जोरदार धडक

कणकवली

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच नांदगाव उड्डाण पूल व ओटव फाटा यामधील मिडलकटवर दोन चारचाकींची एकमेकांना जोरदार धडक होऊन अपघात घडला.सुदैवाने कुणाला गंभीर दुखापत झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले.हि घटना आज ११:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की टोयाटो फॉच्युनर व टाटा टी.आय.गो. सदरची दोन्ही वाहने कणकवलीच्या दिशेने जात असताना नांदगाव स्नेहल निवास समोर असलेल्या मिडलकटकडे टोयोटा फाॅच्युनर कार अचानक या मिडलकटकडे वळत असताना मागून येणारी दुस-या कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघाताची भीषणता ईतकी होती की, दोन्ही वाहने विरूद्ध दिशेला वळली. या अपघातात कारमधील किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी स्थानिकांनी मदतकार्य केले.तर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अरूण जाधव, कासार्डे पोलीस आऊटपोस्टचे ठाणे अंमलदार चंद्रकांत झोरे यानी घटनास्थळी धाव घेत महामार्गावर वाहने बाजूला केली.बहुचर्चित ओटव फाटा व नांदगाव तिठ्ठा सर्व्हीस रोड या अपघातामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून एका बाजूला सर्व्हीस रोड नसल्याने हा मिडलकट ठेवल्याने तो अपघातास निमंत्रण देत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा