इचलकरंजी शहरातील ज्येष्ठ नेते धोंडीलाल शिरगावे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या शाल,ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी व प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला……………… धोंडीलाल शिरगावे हे इचलकरंजी नगरपालिकेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.तसेच पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणून त्यांनी उत्तम काम केले.गेली पाच दशके इचलकरंजीच्या राजकीय,सामाजिक,सहकार,शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.प्रबोधिनीच्या स्थापनेपासून ते ज्येष्ठ सहकारी आहेत.धर्मनिरपेक्ष दलासह विविध पुरोगामी मंचामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य लाभो व ते सतत कार्यरत राहोत अशा शुभेच्छा प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी दिल्या.यावेळी बाशुशेठ बागवान प्रा.रमेश लवटे,डॉ.विलास जोशी,अहमद मुजावर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने धोंडीलाल शिरगावे यांचा सत्कार
- Post published:जून 13, 2022
- Post category:कोल्हापूर / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like

सरंबळ येथे एसटी मोटरसायकल अपघातात आयटी इंजिनियर शुभम परब याचा दुर्दैवी मृत्यू

मराठी राजभाषा दिनानिमित्त मालवण भरड येथे २७ रोजी ‘काव्यसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे यांनी दिला आपदग्रस्तांना दिलासा
