देवगड नांदगाव मार्गावरील असलदे येथे झालेल्या तिहेरी अपघातातील देवगड आगारातील पुणे – देवगड गाडीचा चालक महेश रघुनाथ अतिंग्रे याचा शनिवारी कोल्हापूरला मृत्यू झाला आहे
या अपघातात महेश रघुनाथ अतिंग्रे हा चालक गंभीर जखमी झाला होता त्याच्या पोटाला व कमरेतील खालील भागाला गंभीर दुखापती झाल्या होत्या
त्याच्यावर ओरोस येथे उपचार सुरू होते मात्र अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते त्याचे उपचारादरम्यान निधन झाले आहे
शुक्रवारी पुणे देवगड ही बस घेऊन अतिंग्रे हे देवगडला येत असताना असलदे येथे डंपर ला समोरून धडक बसली त्याचबरोबर मागाहून छोटा टेम्पो एसटीला धडकला
यामध्ये अपघातात अतिग्रे गंभीर जखमी झाले होते अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे