You are currently viewing उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे १४ जून रोजी दोडामार्ग तालुक्यात पहिले रक्तदान शिबिराचे आयोजन 

उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे १४ जून रोजी दोडामार्ग तालुक्यात पहिले रक्तदान शिबिराचे आयोजन 

दोडामार्ग

सिंधुदुर्ग सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व दोडामार्ग शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग तालुक्यात पहिले रक्तदान शिबिर येत्या १४ जून रोजी मंगळवारी दोडामार्ग येथील ग्रीन व्हिलेजच्या सुशीला हॉल मध्ये होणार आहे. गोवा मेडिकल कॉलेजची टीम यावेळी या रक्तदान शिबिरात सहभागी होत असल्याने दोडामार्ग तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी ‘सर्वश्रेष्ठ दान’ अर्थात इतरांचे जिव वाचविण्यासाठी पवित्र रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष व जेष्ठ उद्योजक विवेकानंद नाईक यांनी केलंय.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे, आपण सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो पण रक्त ही अशी बाब आहे की त्याला पर्याय नसतो, ते माणसाने माणसांसाठी दान देऊन माणुसकी जपली पाहिजे. आणि आज जगात सर्वात श्रेष्ठ दान कोणते असेल तर ते रक्तदान आहे. आज अपघातांचे वाढते प्रमाण, सिजरिंग केसेस, गरोदर मातांना डिलिव्हरीवेळी लागणारे रक्त या साऱ्यांनाच रक्ताची गरज असते. काहीवेळी तर विशेषतः गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सरळ पैसे न घेता आपण पर्यायी रक्तदाता द्या आणि रक्त घ्या असा निर्णय घेतला जातो, हा निर्णय अपघाती समयी रक्तपेढीत पुरेसा रक्तपुरवठा असणे याच उद्देशाने असतो. त्यामुळे आजची रक्ताची वाढती मागणी आणि तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिर काळाची गरज बनली आहे. आज युवा पिढी पवित्र रक्तदान करण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहे. त्यामुळे त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास अनेकांचे जिव वाचू शकतात. युवा पिढीला नुसता दोष देऊन उपयोग नाही तर ही युवा शक्ती सकारात्मक बाबींकडे वर्ग करून घ्यायला हवी. आज असाच आदर्श सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानने निर्माण केलाय. त्यामुळे आता दोडामार्ग तालुक्याची जबाबदारी माझ्यावर आली असल्याने अध्यक्ष या नात्याने वर्षाला किमान चार रक्तदान शिबिरे राबविण्याचा आपला मानस असल्याचे विवेकानंद नाईक यांनी दै. कोकणसाद कडे बोलून दाखविले आहे. मुळातच सामाजिक कार्याचा वसा असलेले विवेकानंद नाईक यांनी यापूर्वी सुद्धा दोडामार्ग तालुक्यात अनेकांगी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अलीकडेच दोडामार्ग शहरासाठी त्यांनी स्वतःच्या ट्रस्ट च्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली शववाहिका, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, महिलांसाठी विविधांगी उपक्रम यात आता त्यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सहकाऱ्यांच्या माध्यमातून दोडामार्ग मधील जनतेला एक हक्काचे रक्तपुरवठा केंद्र निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार युवा पिढी आणि समाजासाठी प्रेरणादायी असाच आहे.

संपूर्ण स्वखर्चाने आपल्याच प्रशस्त सुशीला हॉल मध्ये हे शिबीर मंगळवारी १४ जून ला सकाळपासून सुरू होणार असून गोवा मेडिकल हॉस्पिटलची टीम व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात सहभागी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड सुद्धा वितरित केलं जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा