मुंबई :
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा आहे.मात्र त्यासाठी अजुन काही दिवस वाट पहावी लागणार आहे. निकाल १५ जून नंतरच जाहिर होइल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शास्त्रीय कला,चित्रकला,आणी लोककला या कोट्यासाठी विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव देण्यास ६ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मदतीत अनेक विद्यार्थ्यांचे वाढीव गुणांचे प्रस्ताव आले असुन या प्रस्तावांची तपासणी करुन विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचे काम सध्या सुरु आहे, असे प्रस्ताव देलेले विद्यार्थी राज्यात ३० हजारहून आहेत.
त्या विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांना गुण देण्यात येणार आहेत. यामुळे दहावीच्या निकालाची अद्याप कोणतीही तारीख ठरविण्यात आली नाही.