You are currently viewing वसंत प्लाझा मध्ये सांडपाणी प्रश्न गंभीर – संजू परब

वसंत प्लाझा मध्ये सांडपाणी प्रश्न गंभीर – संजू परब

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरात सावंतवाडी नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने इमारतीमधील सांडपाण्याबाबत काही इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. शहरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ही खरी बाब असली तरी सावंतवाडी नगर पालिका प्रशासनात हिंमत असेल तर त्यांनी गांधी चौकातील वसंत प्लाझा इमारतीमधील साडपाण्याच्या प्रश्नाबाबत नोटीस काढून दाखवावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजय परब यांनी दिले.

सावंतवाडी शहरातील पाणी प्रश्नाबाबत मी वारंवार आवाज उठविला दोन वर्षात सांडपाणी प्रश्नाबाबत काही नियोजन करता येईल का याची तरतूदही केली. मात्र आमच्या अगोदर ज्यांच्या हाती गेली 25 वर्षे सत्ता आहे. त्यांनी सांडपाणी प्रश्न गांभीर्याने घेतले नाही. बंदिस्त गटार योजना होणे आवश्यक होते पण त्याच्या सत्तेच्या काळात नाही त्यांनी या बंदिस्त गटार योजनेला मूर्तरूप दिलेच नाही. वसंत प्लाझा मध्ये पार्किंग तसेच सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. ईमारतीच्या मालकांना नोटीस जारी करावी, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eight =